aaichi icha
बाबा म्हणाले जिंक फक्त
जग हे असच असत
जिंकण्यापेक्षा काय आहे जास्त
मला हि हेच वाटे रास्त ||१||
भेटल्या असतील खूप जणी
आयष्यात नाही काही उणी
नसेल जरी का कुणी
पण ध्येय ठेवलाय मणी ||२||
जर ती भेटली तरच मी जिंकेन
हे मूर्खपणाचे आहे मी म्हणेन
मी का कुणाला शमेन
जिंकलो तरच थांबेन ||३||
आई ची पण हीच इच्छा आहे
आई पेक्षा कोणी पोरगी का मोठी आहे
जिंकणे हे नित्य आहे
मग कशाला भियाची गरज आहे ||४||
पोरी साठी रडणे हे मला फुकाचे वाटते
दम असेल तर कोणीही भेटते
जर पोरगी मिळवणे हेच खरे ठरते
तर रतन टाटा अन अब्दुल कलाम कसे झाले असते ||५||
मूर्खानाच मुलीचे प्रेम मोठे वाटते
शहाण्यासाठी जिंकणे हेच खरे असते
जेव्हा महत्वाकांक्षा मनाला शिवते
तेव्हा फक्त आईच्या आशिर्वादाला महत्व असते ||६||
मी कसे म्हणेन आई ला मला जिंकायचे नाही
जर आईसाठी माझे जिंकणेंच आहे सर्व काही
ज्याला जे बोलायचे ते बोलत राही
मी तेच कारेन जे आहे नेमके सही ||७||
बस आटा खूप बोललो
मरेन जर मी माघारी फिरलो
आत्ता मी तहान मांडून बसलो
अन यशाच्या शिखरावर वसलो ||८||
Comments
Post a Comment