आई
मला आज आठवण आली ती माझी आई
जशी गोड दुधावर करुणेची साई
आपल्या पाडसाची सर्वांगीण दाई
प्रत्येक मुलाची आधार आणि प्रेरणा माई ||१||
मला कळत न्हवते काई
ती मात्र मला बोट धरून चालवत राय
इवलेशेच होते माझे पाय
म्हणून कडेवर घ्यायची करायची घाय ||२||
घास जमवायला मला जमायचे नाय
तेव्हा मला भरवायची माझी माय
खारी बिस्किटासोबत द्यायची मला चाय
माझे पोट भरले तरच मग ती जेवायला जाय ||३||
मला न्हाऊ घालणे
अंगावरचे कपडे बदलणे
शाळेसाठी तय्यार करणे
हे तिचे माझ्यासाठी नित्य होते करणे ||४||
आठवतो शाळेचा पहिला दिवस तो मधास
शाळेत सोडून आई निघून गेली मन झाले उदास
कासाविससा काहीसा वर्गात होत होता तिचा आभास
शाळा सुटली आणि ती दिसली मग टाकला सुटकेचा निश्वास ||५||
शाळेत पहिला येणे हा होता तिचा नेहमीचा लकडा
हट्ट असे तिचा वर्गात पकडावा पहिला बाकडा
मी व्हावा कोणीतरी आसामी बडा
माझ्या साठी अनेक स्वप्नांचा लावला होता तिने सडा ||६||
माझ्या निर्धारी आयुष्याचा कणा होती ती
माझे मनोध्येर्य वाढवणे जबाबदारी समजायची ती
माझ्या आयष्याच्या खूप उतरचढावांची साक्ष होती ती
माझ्या आयष्याच्या उतूंगशिखरावर नेणारी माझी माय होती ती ||७||
मी माझ्या होणाऱ्या तिला निवडली
आईने तिला बघायला बोलाविली
माझ्या आनंदातच तिने आपली हौस मानली
माझे भाग्यच थोर ते जे मला अशी आई मिळाली ||८||
मीऑफिसात जात असताना, मला आईची आठवण झाली ||
जरी ती आज इथे, माझ्या सोबत राहात नसली ||१||
शाळेत शिकत असताना, ती मला रोज खाऊ घालायची ||
अभ्यास चांगला करावा, म्हणून रोज लकडा लावायची ||२||
पाहिजे होते मला क्रिकेटचे किट, पैसे मोजले तिने फटकन ||
जरी खेळण्यात गुंतलो असलो, तरी जेवायला बोलवायची पटकन ||३||
मला आवडते खायला खूप चांगले, म्हणून बनवायची पदार्थ खमंग ||
दर दिवाळी सणाला, घ्यायची नवीन कपडे ठरवुनी रंग ||४||
माझ्या ह्या अनोख्या आयुष्यातली, ती एक चांगली मैत्रीण होती ||
सुखातही आणि दुखातही, साथ देणारी ती एक सखी होती ||५||
मला आवडली ती, मी आईला सांगितले ||
प्रेम करण्यासाठी शोधायला प्रेयसी, पण तिनेच मला सांगितले ||६||
चालता येत न्हवतं म्हणून, कडेवर घ्यायशीच तू मला ||
आजही मला या आठवणी येतात, काय सांगू आई तुला ||७||
मला आठवतात ते दिवस, जेव्हा मे शाळेतून घरी यायचो ||
तू ठेवायशीच तयार जेवण, अन मी लगेच जेवायला बसायचो ||८||
बुद्ध पौर्णिमा जवळ आली, कि तू चांगले पदार्थ कार्यशीच ||
आंबेडकर जयंती आली, कि नवीन कपडे तू मला घ्यायशीच ||९||
मला सायकल चालवायची होती, म्हणून तू मला दररोज पैसे द्यायाशीच ||
बाईक चालवायला शिकण्यासाठी, पण तूच आग्रह करायशीच ||१०||
नौकरी लागली मला, तुझे आनंदाश्रू थिटे झाले होते ||
पुढे व्यवसाय सुरु केला, तेव्हाही तुझ्या आनंदाला उधाण आले होते ||११||
रात्री उशिरापर्यंत ऑफिसात असलो कि, तुला खूप राग यायचा आई ||
कधी कामामुळे घरी नाही आलो, तर तू अगदी कासावीस व्हायशीच माझे माई ||१२||
माझ्या गत कर्माचे फळ म्हणून कदाचित, लाभलीस तू मला आई ह्या जन्मी ||
सदैव ऋणी राहीन मी त्याचा, जर का लाभलीस तू मला आई जन्मोजन्मी ||१३||
Comments
Post a Comment