background
पार्श्वभूमी म्हणजे काय असते
ते तर ओळखीचे निम्मित असते
जिंकण्याला क्षमता लागते
मग मला जण असे का विचारते ||१||
नसेल कदाचित मी सुंदर तेवढा
असेल तुमच्यात सौंदर्याचा सडा
गौण समजणे तेवढे सोडा
जाऊद्याकी थोडा तुमच्या अहंकाराला तडा ||२||
जण का हे उगाचच वेडे होती
त्यांना जे समजे ते मला ना समजती
ठायी सौंदर्य हे जगात बहरती
मी पण दाखवेन जर मला संधी मिळती ||३||
हे खरेच योग्य आहे का
नेहमीच मी आपली योग्यता दाखवावीका
सिद्ध मी आपल्या पुढल्या पावलाला
उन्नतीच्या महामेरुला शिवायला ||४||
बंधने ती किती असावी विचारतोय
तोडेन ती मी असे मी समजतोय
हटली ती तर मी जिंकतोय
काही चांगल्याची मी अपेक्षा करतोय ||५||
जहागीर नसे मी कोणाची
असेल अपेक्षा जरी तशी काही मनांची
आहे ती पूर्णतः चुकीची
जागा असावी थोडी त्यात प्रेमाची ||६||
ना काळे हे योग्य कि अयोग्य
वेळच सांगेल ते भाग्य
शेवटी एवढेच सांग्य
अपेक्षित एवढेच काही चांगले वांग्य ||७||
बरे प्रश्न आहे तर त्याचे उत्तर हि असेल
ह्या प्रश्नाचे पण काही तरी निवारण असेल
वेळ घेऊनि मी स्वतःला बनवेल
तो क्षण येईन जेव्हा मी जिंकेल ||८||
Comments
Post a Comment