Lavani var kahi
* हि लावणी बद्दल आहे अन ह्याचा सुनील तांबे शी काही हि एक संबंध नसून तसेच कृपया लक्षात घ्यावे विनंतीवरून
* शिणगार म्हणजे सुनील तांबे न्हवे
गरम शिणगार व्हावा फुक्काचा
कशाला हवा शिणगार त्यांचा
ठेवावा पत्ता अकलेचा
तो थंड गर वारा सुखाचा ||१||
कागद असेल भले हि माझा कोरा
बाळगतो करण्याची धमक अन तो तोरा
आहे आदर्श असण्या ठायी
गत्यंतर नसे दुसरे बाई ||२||
शाहिरी लेखणी गुण तो नवसाचा
नसे तो असाच कोणाचा
वरण भात कि चिकन भात ज्याचे त्याने जाणावे
आपण फक्त आपले ध्यान आणावे ||३||
सोंग ढोंग नाही हे सजणे
ते गरज असे ठायी रुजणे
साळसूदाची का गरज असणे
उगाच का कोण कोणास छेडणे ||४||
इष्काचा भार का व्हावा फार
पिचकारीत रंग भरला ठार
उडुदे रंग तो चौफेर
व्हावे काही तरी चांगले अफैर ||५||
मखमली पडद्याच्या आत
पुनवेची रात
चांदणी न्हात
काहीच नाही त्यात ||६||
होऊ दे दंग
झाला सगळ्यांचा भंग
हेच गाणे सांग
वर्षाला पिटण्यास लागली रांग ||७||
छबीदार छबी गेली काळोखात
चांदणी चम चम नाही होत आत
शोभा आत्ता पुरे अन काय हवं
हे वागणं बर न्हवं ||८||
पुरे झाले आत्ता समजावं
बाकी काय हवं
ज्याचे त्याचे त्याने जानवं
एव्हडेच लक्षात ठेवावं ||९||
मला एव्हढेच ठाव
कोणी उगाचच कोणास ना शिकवावं
होऊद्या जे व्हावयाचे व्हावं
तुम्हीच ठरवावं हसावं कि रडावं ||१०||
Comments
Post a Comment