stri stuti

 


मी एक पुरुष आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे

स्त्री आकर्षण बाळगणे वाटायचे ह्यात काय घाण आहे

तो तर पुरुषी गुणधर्म अन स्त्रीत्त्वाला मान आहे 

स्त्री आणि पुरुष ह्यांच्या नात्यात एक वेगळीच शान आहे ||१||

माझ्या आयुष्यात खूप अश्या मुली आल्या असतील 

प्रेमात मी त्यांच्या अन त्या माझ्या पडल्या हि असतील 

प्रेम होणे मुलीवर वाटायचे काय ह्यात गैर आहे

प्रीत बाळगणे मुलीवर एक आगळीच मौज आहे ||२||

माझ्या आईने मला लहानाचे मोठे केले ती एक स्त्री होती

मला खाऊ घालायची ती माझी बहीण पण एक स्त्री होती 

मला अभ्यासात मदत करायची ती माझी मैत्रीण पण एक स्त्री होती 

माझ्यावर जीवापाड प्रेम करायची ती माझी प्रेयसी अन बायको पण एक स्त्री होती ||३||

आपल्या भारतात खूप थोर स्त्रिया होऊन गेल्या

विदेशात पण त्यांनी खूप मोठ्या शिड्या गाठल्या

खूप साऱ्या चांगल्या गोष्टींचा वारसा त्या देऊन गेल्या 

सुश्रष्ठीला त्या एक नवीन रंग देऊन गेल्या ||४||

आज मुली शाळेत जातात

पुढे त्या कॉलेज हि करतात 

मग नौकरी हि मिळवतात 

व्यवसायात हि अग्रेसर असतात ||५||

आज पाहतो मी ती स्त्री पोहोचली अंतराळात 

कुठे तरी ती उंचावत आहे अगदी व्यवसायात 

उठून दिसते ती त्या पाहिलेल्या फिल्मात 

आजची स्त्री पाहताच बसते अगदी मनात ||६||

काय अपेक्षा असावी त्यांच्याबद्दल आपल्यात 

प्रेम असावे अंतकरणात ना रोष असावा देहात 

आसक्ती बाळगावी कमी समभावना असावी मनात 

कुकृत्य अन कुचेष्टा अवारावी अन कोणास कमी ना लेखावे एवढीच बात ||७||

कधी झाल्या असतील काही चुका माझ्यापासून 

नाही का होत त्या तुमच्यापासून

जरी काहीही असेन मी श्रेष्ठ कि कनिष्ठ 

नतमस्तक आहे मी स्त्री अन स्त्रीत्वावर कारण तीच श्रेष्ठ ||८||




मान्य स्त्री असे श्रेष्ठ 

काढावी त्यांची खरंच कोणी द्रिष्ठ

ना काळे त्यांस कोण ज्येष्ठ 

अकारण बसावे का त्यांनी तिष्ठ ||१||

ना झाले असते राम मोहन रॉय

ना झाले असते आंबेडकर 

ना झाले असते महात्मा फुले

कोणी केले त्यांस अधिकाराचे दरवाजे खुले ||२||

मुलगी शिकली प्रगती झाली

आज हि त्यांची काय गत झाली

विवेकाला ती मुकली

अक्कल तिने कुठे विकली ||३||

कोण असे कश्यात प्रविष्ठ

का पकडावा मार्ग तो भ्रष्ठ 

आई बापांनी सोसले असतील किती कष्ट 

का करावे कोणाचे आपण नष्ट ||४||

कोण ठरवणार कोण चांगले

ते तर ठरणार जसे आपण वागले 

नको आत्ता ते मागले

बघावे काय असे पुढले ||५||

गुणांनी व्हावे आपण श्रेष्ठ 

शिकवावी कोणी तुम्हांस शिष्ठ 

ना वाढवावं उगाच हा क्लेष्ठ

अकलेशी राहावे निष्ठ ||६||

काय मोठे योग्यता कि सौन्दर्य 

दाखवले मी एकदा औदार्य 

कोण बनवतो आपणास भार्या 

येतो फक्त करन्यास कार्या ||७||

समज व्हावा वेळेसी आपणांस 

का लागावे कोणाच्या नादास

नको तो मूर्खांचा सहवास 

प्रेम वाढेल हाच विश्वास ||८||


Comments