Bhavu and Bahin

 


भाव आणि बहिणीचे नाते काय असावे

एक विश्वासाची दोर 

ते मानावे कि ना मानावे 

ह्यावर नसावा कोणाचा जोर ||१||

बहिणीचे प्रेम अन भावना भावासाठी काय असावे

का कोणी ह्याचे अन कशे मोजमाप करावे ||२||

ठेच त्याला लागते, अन वेदना हिला होते

शाळेच्या परीक्षेत पास तो होतो, आनंद हिला होतो 

खेळामध्ये तो जिंकतो, विजयाचा मान हिच्यात वाढतो 

प्रेयसी त्याला मिळते, वाहिनी मिळाल्याची ख़ुशी हिला होते

नौकरी त्याला लागते, मिठाई हि वाढते 

व्यवसायात यश तो मिळवतो, आनंद द्विगुणित हिचा होतो 

यशाच्या पायऱ्या तो चढतो, देवाला नवस हिचा असतो 

भाऊबीजेला तो घरी नसतो, जीवात जीव हिच्या नसतो ||३||

भावाचे प्रेम अन भावना बहिणीसाठी काय असावे

तेवढे जेवढे जगात असतील सारे काजवे ||४||

जखम हिला होते, जीवाची घालमेल ह्याची होते 

परीक्षेत पास ती होते, सर्वांना सांगत सुटणे ह्याला बरे वाटते 

नौकरी तिला लागते, पेढ्यांसाठी पैसे ह्याचे खर्च होते 

व्यवसायात ती यश मिळवते, ह्याचे मन खुशीने नाचते

पारितोषिके ती मिळवते, त्याचे ह्याला बरे वाटते

लग्न तिचे होत असते, नाचून अंग ओले ह्याचे होते 

रक्षाबंधनाला ती आली नसते, मन बैचैन ह्याचे होते 

ती सासरी जाते, उदासीनता ह्याची वाढते ||५||

भाव अन बहिणीचे नाते हे असेच असते

जशी कापरामुळे ती ज्योत पेटत असते ||६||

ते एक संपूर्ण नात्याचे प्रतीक असते

भावाशिवाय बहीण अन बहिणीशिवाय भाऊ खरंच ह्यात एक उणीव भासते ||७||

बहीण जी मायेने भरवणारी, गोंजारणारी, आईची माया देणारी असते

तर तिचा हट्ट पुरवताना दमछाक झाली तर लडिवाळ पने हसून मन खुलवणारी असते

भाऊ जो काळजी करणारा, लाडाने भरवणारा, वडिलकीची माया देणारा असतो

तर खेळताना बहिणीच्या मागे पळणारा, लाडिवाळ सोनूला असतो ||८||


Comments

Popular posts from this blog

stri stuti

Lavani var kahi