akkal gahan takalela samaj

 अक्कल गहाण टाकलेला समाज

ज्याला माणुसकीचा ना वास

वाटतो मला तो एक फास

फुक्काच्या हुशारकीचा तो साज ||१||

त्यांना वाटते मला कशाचा आहे नाज

मूर्खपणाचे गाणे गाज

अकलेला ठेवुनी कुठेतरी त्याज

मनातल्या जळमटांचे भरतोय व्याज ||२||

मानवतेचा माझा भास खोटा होता 

तो तर एक पोकळ आभास होता 

फक्त स्वतःच्या मोठेपणाचा ध्यास होता

मानवतेला फक्त फसवणुकीत रस होता ||३||

काळजी किती ती डोंगराएवढी

जवळ जाताच ती दिसली ती चन्या एवढी

ती तर फक्त होती कुबेराची गढी

खोट्या बात्तांची होती ती शिडी ||४||

लाडिक वाटतो तो खूप बालहट्ट 

का वाटावा तसा स्त्रीहट्ट 

सैल करावी गाठ जी आहे गठ

कोणाच्या अधिकाराची का लावावी वाट ||५||

देवाने खांदा दिला आहे सर्वांना

जर समाज सेवेची हौस आहे जनमनांना

तर खांदा वापरावा अपलाना

नाही तर गंगेत जाऊन डुबाना ||६||

जर स्वभाव असेल आपला लाघवी

तर दिन जणांना का न हसवी

का कोणाची दुर्दशा व्हावी

ह्यात कसली अक्कल दडली असावी ||७||

मोठेपणाचा आव आणणे संपले आत्ता

पित्त उघड झाले आत्ता 

ज्याला त्याला आपल्या जगण्याची सत्ता

हलकट पण पुरे आत्ता ||८||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi