loke
ह्याला काय म्हणायचे
लोकांचा प्रभाव कि प्रादुर्भाव
कश्यात काय अन कश्याचे
राहिला ना कुठला सद्भाव ||१||
जण समजती असायला हवा हक्क
कोणावर माझ्यावर इतरांचा
करू पाहतो ठेवण्या मजवर धाक
मत्सर ठेवुनी माझ्या गुणांचा ||२||
देश अमुचा असतो उच्च पदी जनसंख्येत
शंका दाटती मनात काय ह्याचे प्रयोजन
योग कि भोग हा कसला संकेत
रममाण मने का विसरती करण्या नियोजन ||३||
चोरी मला करण्या काहीपण
समाजसेवेपायी हे करती बिनधास्त
हेतू न दिसावा मज काहीपण
हे ते ठरवुनी वाईट होती निर्धास्त ||४||
करू पाहत आहेत मला प्रणयासाठी उत्तेजित
उद्दिष्ठे न दिसावी ह्यांची उच्चीत
दाखवून दृश्ये ह्यांनी ठरवलेली नियोजित
करू पाहत आहेत मला अगदी निपचित ||५||
मी काय खावे अन काय नाही हा ह्यांना प्रश्न
मी मात्र आहे एक उत्तम खवय्या
पदार्थ पाहताच मेजवरचे माझे होते नजर ह्यांची तीक्ष्ण
मनाची जळण करून घेणे हा त्यांचा रवय्या ||६||
अंगभूत गुणांना पण असावी भीती
प्रत्येक गोष्टीवर असते ह्यांना शंका
ठरवावे का ह्यांनी काय असावे किती
मात्र मजमुळे वाजवा ह्यांचा चहुमुलखी डंका ||७||
परावलंबी प्रसिद्ध गुपित निष्णात का खरे योग्य
हि तर आहे खरी विडंबना
माझ्या गुणांना मिळवणे हे अहोभाग्य
मी जर असेल योग्य ते ठरवेल वेळचना ||८||
Comments
Post a Comment