navya yugachi pahat

 एक पहाट झाली किरणे त्याची तेजस्वी

नव्या युगाचा स्पर्श त्यात भासावी 

सुटले साखळदंड गुलामीच्या पाशातून 

आत्ता का असावे भय कसले अन कशातून ||१||

नीर नसे अमृत आम्हास असे विशापरी 

स्पर्श करुनि महामानवाने दिले आम्हास जगण्यापरी 

छळ सोसणे होती ती सवय

पण आत्ता फिरला तो समय ||२||

स्पृहातून होतो आमच्या विटाळ 

किती गोष्ट ती रटाळ 

मेलेली जनावरे वाटे कधी आम्हांस रास्त 

कारण न्हवते काही दुसरे आमच्याकडे जास्त ||३||

योग्यता ठरवते प्रतिभा कि वर्ण 

अगदी नाही सुटला ह्यातून तो महाधनुर्धर कर्ण

ह्या जीवना पेक्षा बरे असावे ते मरण 

मिळणे कठीण होते अगदी मारण्यानंतरही सारण ||४||

आमच्या स्त्रिया होत्या देवासाठी 

आणि नंतर सर्वांसाठी 

पण आज आहे ती डॉक्टर किंवा इंजिनेर 

अन काही ठिकाणी अगदी सिनियर ||५||

शतकांची न्हवे होती ती गुलामगिरी हजारो वर्षांची 

घेतला जन्म महामानवाने अन उगवली किरणे आशेची 

दिधले आम्हास बरोबरीचे अधिकार 

अन केला जनमानसात समतेचा पुरस्कार ||६||

आज तोच पद-दलित बांधतोय यशाचे तोरण 

काय असावे ह्यात दुसरे कारण  

क्षमता अन बुद्धिमत्ता नसते जाती पर्यंत मर्यादित 

प्रतिभा आणि इच्छाशक्ती हेच ते गणित ||७||

असो शेवटी काळोख सरला

उगवली नवी पहाट 

पुरोगामी विचार योग्यच ठरला 

आहे शक्ती आम्हात अचाट ||८||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi