dalit

 आजही माणुसकी सापडली ना अम्हांसाठी

मिळालेले हे स्वातंत्र्य कशासाठी 

सवर्णांच्या बंदुकींसाठी 

हक्काचा पत्ता शोधण्यासाठी ||१||

होता तो अंधाराचा काळोख कधीकाळी 

वाट पाहतोय उठू आम्ही सकाळी 

होईल जागा आम्हाला मोकळी

अन आमचेही वस्त्र त्या दोरीवर वाळी ||२||

का खरंच गरज आहे करण्या गदर 

का वाटावा आम्हाला ह्या समाजव्यवस्थेचा आदर

जर ह्यात आमचा हक्कच असेल नादार

आम्हालाही आमच्या हक्काची हवी चादर ||३||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi