dur desh

 जेव्हा सूर्य येतो मावळतीला इथे 

उगवतो मात्र लांब कुठे तिथे 

आहे जणांना आकर्षण त्याचे इथे 

कसे असावे जग ते तिथे  ||1||

आले सर्व भागातून लोक एकवटून 

बनवला त्यांनी देश तो झटून 

थांबले ते यश गाठून 

अन शहरे थाटात थाटून ||2||

आहे त्या देशात किती सुंदर नारी

पुरुष हि नसे काही दिसण्यात थोडे तरी 

काहींनी वाढवले आहे वजन फार 

खातात तिथे लोक चीज खूपच फार ||3||

सांगतो मी माहिती त्याची सजणे 

कसे लागले नाव ते त्याचे गाजाने

लोक इथे शिकतात त्यांना पाहून 

स्वतः मध्ये काही क्षमता नाही म्हणून ||4||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi