mazya aai

 मी आईला वंदन केलं 

अन थोडं बर वाटलं 

काहीस मनातनं दाटलं 

अश्रू माझे डोळ्यात साठलं ||१||

आई जी म्हटलं ती माझी जन्मदाती न्हवे

जी नेहमी असायची बाबासाहेबांच्या सवे

सन्मानानं नाव तीच घेयला हवे

रमाई तीच नाव जी आई मनाला भावे ||२||

आठवण आज हि येते आम्हा लेकरांना 

दाटून येतात खूप अशा भावना 

किती सोसल्या आहेत तिने यातना

करावा लागला आहे तिला खूप संकटांचा सामना ||३||

साधारण गोष्ट न्हवती बाबासाहबांची बायको होणे 

पण आमच्या रमाई सारखी भार्या अवघड असे मिळणे 

ती जोडी विरळच पुन्हा होणे 

आम्ही आत्ता पोरके वाटे सर्व उणे ||४||

कष्ट सोसले बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी 

हट्ट ना धरला कधी मौजेसाठी 

पण राबली फक्त बाबासाहेबांच्या प्रेमासाठी

जगली ती फक्त बाबासाहेबांना मोठे होताना बघण्यासाठी ||५||

गवऱ्या शेणी थापल्या तिने

रेल्वे वर दगडी टाकल्या तिने

नेटाने संसार चालवला तिने

अन बाबासाहेबांना आधार ढिला तिने ||६||

जर असती कोण दुसरी तर कधीच मोडली असती

स्वतःच्या हौशेसाठी भांडली असती

जबाबदारी पासून हटली असती

जर का ती रमाई नसती ||७||




ज्योतिबांची ज्योत सावित्रीमाईंनी फुलवली

कित्येक फुल बहरली

कित्येक आव्हान पेलवली

पण ना ती कधी हरली ||१||

महात्मा ज्योतिबा फुलेंची पत्नी ती

सावित्रीमाई फुले आमची आई ती

हो भारताची पहिली मुख्याध्यापिका ती

आजच्या मुलींची प्रेरणा ती ||२||

ना मिळाली असती ज्योतीबांना अशी जोडीदार

किती मानावे सावित्रीमाईचे आभार 

सोसला तिने अपमानाचा भार

पण पतीचा होती ती एक कणखर आधार ||३||

ज्योतीबांनी शिकविले सावित्रीमाईंना 

अन तिने शिकविले कित्येक बाळींना

ना पटले हे सनातन्यांना 

करावा लागला त्यांचा सावित्रीमाईंना सामना ||४||

शिकवण्यांस मुली त्या पडल्या बाहेर 

पण भेटला त्यांना दगड गोट्यांचा आहेर

भाग्य लाभले त्याला ते पुणे शेहेर 

पूर्ण केले तिने ज्योतिबाचे स्वप्न अखेर ||५||

साथ लाभली काही अंशी काहींची

आत्ता गरज होती उभारण्या शाळेची 

अन शिकण्यासाठी मुलींची 

अन पाटी अन पेन्सिलची ||६||

शाळेसाठी वाडा दिला एक मुसलमानाने 

केली सुरवात शकवण्या अभमानाने

म्हणून सांगतो आहे मी सन्मानाने 

सावित्रीमाई नाव हे घ्या मानाने ||७||


Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi