Prem Kavita

 नवतीचे दिवस होते ते माझे

अभ्यासाचे खूपच होते ओझे

पण एक दिवस तिला पहिले

अन सहज तिने माझे लक्ष हेरले ||१||

रोज कॉलेजला जाताना ती दिसायची

उगाचच माझ्या कडे बघून मग ती हसायची 

मला मात्र ती एका परी सारखी वाटायची 

का ती होती सुरुवात एक प्रेमाची ||२||

नकळत माझी तिजी ओळख झाली

जेव्हा ती माझ्या वर्गात बसायला आली

नंतर कॅन्टीन मध्येही ती दिसू लागली

अन शेवटी ती आमच्या ग्रुपची झाली ||३||

पाऊस पडत होता खूप त्या दिवशी

ती आडोशाला उभी राहून वाट पाहत होती काहीशी

मी तिला छत्रीत घेतले जागा होती जराशी

पण संयम बाळगणे ठरवले मनाशी ||४||

नोट्स लिहिणे मलाही जमत होते

पण तिज्या पासून लिहून घेणे मला बरे वाटत होते

नोट्स तर एक बहाण्याचे कारण होते

खरं तर तिला ते भेटण्याचे निम्मित होते ||५||

थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहणे

एकाच ग्लास मध्ये ती चाय पिणे

बस मध्ये एकमेकांसोबत बसने

ह्या क्षणांपेक्षा दुसरा आनंद कष्ट असणे ||६||

कधी मी तिज्या घरी जायचो

तर ती कधी माझ्या घरी यायची

काट्यावरती ती आम्हा दोघांची जोडी बसायची

पण काहीस अंतर राखून असायची ||७||

तिज्या हसण्या पेक्षा काय वेगळे स्वर्गसुख असेल वाटायचे 

तिज विरहाचे क्षण अगदी अंधारासारखे भासायचे

मन वेडे तिज्या गोड आठवणीत मुरायचे 

हे असे दिवस होते ते प्रेमाचे ||८||




ती दिसणे हे एक वेगळेच सुख होते

निम्मित काढूनतीला पाहेन हे काही औरच होते

मन माझे तिज्या कडे होते

त्या सुंदर परीच्या पारड्यात ते पडले होते ||१||

होय ते माझं प्रेम होत

अन असण्यात तरी काय वाईट होत

मन तिज्यात जडलं होत

खूप अस सुंदर रूप तिझ होत ||२||

माझ्या प्रेमाची सुरुवात काहीशी आगळीच होती

ती चित्रकथा काही वेगळीच होती

ती एक दिवाळीची रात्र होती

ती समोर चहा पीत बसली होती ||३||

एके दिवशी ती आमच्या ओट्यात बसली

मी येताच ती काही लाजली

माझ्या मनात देखील सुखाची आरास सजली 

अशीच ती माझ्या कडे पाहून हसली ||४||

अभ्यासात मन लागत न्हवते अजिबात

खेळात हि वाटे सर्व बेबात

विचार केला कि ती वाटे फुल परिजात

फक्त तिचा विचार अन दुसरी क्या बात ||५||

एक दिवस ती अन मी एकांतात होतो

काही गोड असे आम्ही बोलत होतो

अचानक माझा हात तिच्या हातात जातो

तिचा स्पर्श माझे चर्र अशे काळीज कापतो ||६||

बोलता बोलता आमची नजर एकमेकांशी भिडली

तिची नजर माझ्या अन माझी तिच्या होटांकडे वळली 

आम्ही मात्र आमची भान एका वेगळ्या भावनेने हरवली

होटांना होट मिळताच अनेक चुंबने वर्शावली ||७||

आज मला ती आठवण उगाचच आली

काही ती प्रेमाच्या आठवणी उचंबळून आली

कारण तीच शेवटी माझ्या मुलांची आई झाली

तीच ती माझी प्रेमिका माझी बायको झाली ||८||




प्रेम म्हणजे काय असते 
एक युगल एक होणे असते
कि दोन मने एक होणे असते
कि दोन मनांमध्ये भावनांची लाट असते ||१||
प्रियकराचे आतभावनेने आतुर होणे म्हणजे प्रेम
प्रेयसीचे मनात भावनांची लाट येणे म्हणजे प्रेम 
एकमेकांच्या भेटीसाठी डोळे लावणे म्हणजे प्रेम 
कि एकमेकांना पाहण्यासाठी तरसने म्हणजे प्रेम ||२||
तो उगाचच तुझी वाट पाहत उभा असतो
ती येताच त्याच्या मनात रोमांच दाटतो 
जवळ येताच दोघांच्या मनात एक अंकुर फुटतो 
तिचा हात हातात घेताच तो सुखद अनुभवाने शहारतो ||३||
तिचे मन अगदी लाजेने फुलते 
ह्याचे मन एका वेगळ्याच भावनेने खुलते 
दोघांमध्ये संवादाची कळी उमलते 
मग थेट नजरेला नजर मिळते ||४||
त्याला तिच्याशी संवाद साधने बरे वाटते
तिला कवेत घेणे बरे वाटते 
तिच्या गालावरून हात फिरवणे बरे वाटते 
तिच्या केसांबरोबर खेळणे बरे वाटते ||५||
तिच्या मांडीवर डोके ठेवून पाडाव
तिने तिचा हात आपल्या गालावर ठेवावं
मग अलगद केस तिने पुढे सोडून द्यावं
अन केसांच्या आडोशातून तिच्या ओठांना ओठात घ्यावं ||६||
चालत असताना तिने त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवावा 
मग थांबून तिला आपल्या आवेशात घेऊन उभा रहावा 
तिच्या गालावरचा लट अलगद बाजूला सारावा
तीच डोकं आपल्या खांद्यावर ठेवून बिलगून रहावा ||७||
प्रेम म्हणजे काय असते ते एकदा करून पाहावं 
एकमेकांमध्ये मरून पाहावं 
एकमेकांच्या ओढीने जळून पाहावं 
बस एकमेकांमध्ये दोघांना विसरून जाऊन पाहावं ||८||





कधी काळी वाटले प्रेम करावे, तिज्यात स्वतःला विसरून जावे
कोणी तरी ती त्या साठी मिळावे, अन जीवन हे सार्थक व्हावे ||१||
वाटलं असेल नशिबात तर मिळेल कोणीतरी, येईल ती वेळ पण कधीतरी 
आल्या किती जणी तरी, कोणास ठावे आहे ती कोण परी ||२||
एके दिवस होतो उभा मी वाटेवर, आली ती तिथे बस स्टॉप वर 
पहिले तिला मी क्षणभर, अन बसली ती मनात अगदी मणभर ||३||
वाटले तिज्यातच विश्व आहे, सर्व काही तिज्या समोर अगदी गौण आहे 
का माझे खरंच भान हरपले आहे, कशातच काही मन राहत नाही आहे ||४||
पुढे ती माझी प्रेयसी झाली, कधी अधून मधून ती भेटू लागली 
कधी एक इच्छा मनात दाटली, हातात हात घेऊन ती माझ्या कवेत आली ||५||
भेट तिझी होणे, हे जणू स्वर्ग प्राप्ती होणे 
दिसताच ती मजला काय होणे, फक्त तिज्याकडेच पाहावेसे वाटणे ||६||
कधी वाटते थांबवावे तिला, अन सांगावे किती मरतो मी तिज्यावर 
हृदय खोलून दाखवावे तिला, किती जीवापाड प्रेम करतो मी तिज्यावर ||७||
कधी भेटली नाही तर ती, जीव अगदी कासावीस होतो 
तिज्याच आठवणी मनात रमती, बस तिज्यातच मग मी झुरतो ||८||
वाटले कधी तरी घेऊन यावे घरी, अन दाखवावे आईला तिला 
आवडेल तिला नक्कीच ती परी, मग वाटते काय कारण आहे घाईला ||९||
प्रेमाला वाचा फुटली, अन प्रेम हे आत्ता बोलू लागले 
प्रेमाला कर्णकमल फुटली, अन प्रेम हे आत्ता ऐकू लागले ||१०||
प्रेमाला नयन फुटले, अन प्रेम हे आत्ता बघू लागले 
प्रेमाला नाक फुटले, अन प्रेम हे आत्ता श्वास घेऊ लागले ||११||
प्रेमाला कर आले, अन प्रेम हे आत्ता धरू लागले
प्रेमाला पद आले, अन प्रेम हे आत्ता चालू लागले ||१२||
तिला भेटल्यावर कळले, प्रेम हे काय असतं
ते आगीत तळपणार भांड असतं
हिम नगात साठलेलं बर्फ असतं 
झाडाला लागलेलं सुमधुर फळ असतं
सरितेच निथळ जळ असतं ||१३||
प्रेम मिळवणं हेच सर्वकाही नसत, ते जिंकणं महत्वाचं असतं 
ती जीवनात भेटणं हेच सर्व काही असतं, तर मग कश्याला जग दुखी असतं ||१४||
प्रेम करावं भिला सारखं, अर्जुनाच्या बाणा सारखं 
अगदी त्या सुनील सारखं, म्हणजे त्या केशवा सारखं ||१५||
बस प्रेम हे असच असावं, ज्यात कोणती शर्त नसावी 
फक्त दोन मने बसावी
दोन होठ हसावी
दोन ह्रिदय जुडावी 
पण कोणती लालसा नसावी ||१६||

Comments

Popular posts from this blog

Bhavu and Bahin

stri stuti

Lavani var kahi