background
पार्श्वभूमी म्हणजे काय असते ते तर ओळखीचे निम्मित असते जिंकण्याला क्षमता लागते मग मला जण असे का विचारते ||१|| नसेल कदाचित मी सुंदर तेवढा असेल तुमच्यात सौंदर्याचा सडा गौण समजणे तेवढे सोडा जाऊद्याकी थोडा तुमच्या अहंकाराला तडा ||२|| जण का हे उगाचच वेडे होती त्यांना जे समजे ते मला ना समजती ठायी सौंदर्य हे जगात बहरती मी पण दाखवेन जर मला संधी मिळती ||३|| हे खरेच योग्य आहे का नेहमीच मी आपली योग्यता दाखवावीका सिद्ध मी आपल्या पुढल्या पावलाला उन्नतीच्या महामेरुला शिवायला ||४|| बंधने ती किती असावी विचारतोय तोडेन ती मी असे मी समजतोय हटली ती तर मी जिंकतोय काही चांगल्याची मी अपेक्षा करतोय ||५|| जहागीर नसे मी कोणाची असेल अपेक्षा जरी तशी काही मनांची आहे ती पूर्णतः चुकीची जागा असावी थोडी त्यात प्रेमाची ||६|| ना काळे हे योग्य कि अयोग्य वेळच सांगेल ते भाग्य शेवटी एवढेच सांग्य अपेक्षित एवढेच काही चांगले वांग्य ||७|| बरे प्रश्न आहे तर त्याचे उत्तर हि असेल ह्या प्रश्नाचे पण काही तरी निवारण असेल वेळ घेऊनि मी स्वतःला बनवेल तो क्षण येईन जेव्हा मी जिंकेल ||८||